Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ODI Rankings : विराट कोहली अव्वल स्थानी; 'या' गोलंदाजाची मात्र घसरण

ODI Rankings : विराट कोहली अव्वल स्थानी; ‘या’ गोलंदाजाची मात्र घसरण

कोहलीने ८५७ गुणांसह फलंदाजांमध्ये अव्वल स्थान राखले.

Related Story

- Advertisement -

भारताचा कर्णधार विराट कोहलीने जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार, कोहलीने ८५७ गुणांसह फलंदाजांमध्ये अव्वल स्थान राखले. त्याच्यात आणि दुसऱ्या स्थानावरील पाकिस्तानच्या बाबर आझममध्ये २० गुणांचा फरक आहे. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याचे ८२५ गुण आहेत. गोलंदाजांच्या यादीत भारताच्या जसप्रीत बुमराहची मात्र चौथ्या स्थानी घसरण झाली.

एका स्थानाची घसरण

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच एकदिवसीय मालिका पार पडली. बुमराह वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेला मुकला. त्यामुळे गोलंदाजांमध्ये त्याची एका स्थानाची घसरण झाली आहे. तो ६९० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीत ट्रेंट बोल्ट ७३७ गुणांसह अव्वल स्थानी आहे. फलंदाजांमध्ये कोहलीने त्याचे अव्वल स्थान कायम राखले. कोहलीने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्याने ५६ धावांची, तर दुसऱ्या सामन्यात त्याने ६६ धावांची खेळी केली.

राहुलला चार स्थानांची बढती

तसेच या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतक करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला फलंदाजांमध्ये चार स्थानांची बढती मिळाली असून तो ३१ व्या स्थानावरून २७ व्या स्थानी पोहोचला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ४२ व्या स्थानी झेप घेतली.

- Advertisement -