Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी हलाल की झटका मटण, आता रेस्टॉरंटबाहेरच झळकणार फलक

हलाल की झटका मटण, आता रेस्टॉरंटबाहेरच झळकणार फलक

Related Story

- Advertisement -

उत्तर दिल्लीमध्ये मांसाहारी नागरिकांना आता रेस्टॉरंट, दुकानांमध्ये जाण्यापूर्वी तिथे हलाल मटण मिळते की झटका मटण हे समजणार आहे. त्यासाठी उत्तर दिल्लीतील महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मटण विक्री करणाऱ्या रेस्टॉरंट आणि दुकानदारांनी ते हलाल मटण विकत आहेत की झटका मटण विकत आहेत याचे फलक लावणे अनिवार्य केले आहे.

दरम्यान यासंदर्भात मंगळवारी उत्तर दिल्लीच्या महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव एनडीएमसीच्या स्थायी समितीने सादर केला होता. उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर जय प्रकाश म्हणाले की, ‘मंगळवारी सभागृहाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता रेस्टॉरंट्स आणि दुकानांना हलाल मटण विकले जात आहे की झटका मटण यासंदर्भात पोस्टर लावणे अनिवार्य आहे.’

- Advertisement -

काय म्हणाले महापौर?

याचे कारण धार्मिक सांगत महापौर म्हणाले की, ‘हिंदू आणि शीख धर्मात हलाल मटणाला निषेध आहे. म्हणून आम्ही एका प्रस्तावाला मंजुरी दिली, ज्यामध्ये उत्तर दिल्ली महापालिकेची सर्व रेस्टॉरंट्स, ढाबे आणि मटणाच्या दुकानांमध्ये हलाल मटण विकत आहेत की झटका याचे पोस्टर लावणे अनिवार्य केले आहे.’

हलाल मटण म्हणजे काय? 

- Advertisement -

एका विशिष्ट पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये प्राण्यांची कत्तल केली जाते. त्याला हलाल असे म्हणतात. यामध्ये प्राण्यांच्या मानेवर सुरी फिरवून त्याची नस कापली जाते. मग त्यातून पूर्णपणे रक्त वाहून दिले जाते त्यानंतर मांस कापले जाते. ही एक शास्त्रीय पद्धत असून रक्त वाहून दिल्यामुळे मांस हे दीर्घकाळ राहते असे म्हटले जाते.

झटका मटण म्हणजे काय?

झटका पद्धतीमध्ये प्राण्याच्या मानेवर एकदाच शस्त्र फिरवून शिर आणि धड वेगळे केले जाते. या पद्धतीचे मांस खासकरून शीख समाजाचे लोक खातात.


हेही वाचा – नवऱ्यासमोरच भर रस्त्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करत काढला व्हिडिओ!


 

- Advertisement -