घरक्रीडाODI Rankings : कोहली दुसऱ्या स्थानी कायम; गोलंदाजांमध्ये बुमराह पाचव्या स्थानावर

ODI Rankings : कोहली दुसऱ्या स्थानी कायम; गोलंदाजांमध्ये बुमराह पाचव्या स्थानावर

Subscribe

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (८६५ गुण) फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील (ODI Rankings) फलंदाजांच्या यादीत आपले अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान कायम राखले आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (८६५ गुण) फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी कायम होता. तसेच विराट आणि रोहित यांनाही आपले स्थान राखण्यात यश आले. विराट ८५७ गुणांसह दुसऱ्या, तर रोहित ८२५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता.

गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहने आपले पाचवे स्थान राखले असून त्याच्या खात्यात ६९० गुण आहेत. या यादीत न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७३७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत मिळून ७ विकेट (पहिल्या सामन्यात ४ आणि दुसऱ्या सामन्यात ३) घेणाऱ्या बांगलादेशच्या ऑफस्पिनर मेहिदी हसनला एका स्थानाची बढती मिळाली आहे.

- Advertisement -

ऑफस्पिनर असलेला मेहिदी ७२५ गुणांसह गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याखालोखाल अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान (७०८ गुण) आणि न्यूझीलंडचा मॅट हेन्री (६९१ गुण) यांचा क्रमांक लागतो. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा रविंद्र जाडेजा नवव्या स्थानी असून त्याचे २४५ गुण आहेत. बांगलादेशचा शाकिब अल हसन ३९६ गुणांसह अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -