घरCORONA UPDATECoronaEffect : T20 वर्ल्डकप लांबणीवर; ICC चा आला निर्णय

CoronaEffect : T20 वर्ल्डकप लांबणीवर; ICC चा आला निर्णय

Subscribe

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या (T-20) टी-२० वर्ल्डकपबाबत (ICC) आयसीसीने आज झालेल्या बैठकीमध्ये अखेर महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Corona) कोरोना संकटामुळे (worldcup) वर्ल्डकप सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टी-२० वर्ल्डकप रद्द होणार की काय, अशी शंका क्रिकेटप्रेमींना वाटू लागली होती. या पार्श्वभूमीवर आज आयसीसीने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये अखेर (australia) ऑस्ट्रेलियामध्ये होणारा वर्ल्डकप पुढे ढकलण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयपीएलचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता (BCCI) बीसीसीआय आयपीएलबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

पुढील वर्ल्डकप भारतामध्येच होणार 

दरम्यान, २०२३ म्हणजेच पुढच्या वर्षी भारतात टी-२० वर्ल्डकप आयोजित केला जाणार होता. हा वर्ल्डकप होणार की नाही, याबाबतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू आता हा वर्ल्डकप आयसीसी खेळवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढील वर्ल्डकप भारतामध्येच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हेही वाचा –

Corona Update: राज्यात २४ तासांत ८,२४० नवे रूग्ण; १७६ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -