वर्ल्ड कप २०१९: सराव सामन्यात धोनी, राहुलची शतकी सलामी

ms dhoni and rahul ind vs ban

वर्ल्ड कप २०१९ सुरु होण्यापूर्वी भारताने दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशविरोधात ३५९ धावांचा डोंगर उभा केला आहे. न्युझीलंडसोबतचा पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामनात भारतीय बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात के. एल. राहुलने १०८ आणि महेंद्र सिंह धोनीने ११३ धावांची खेळी केली. भारताने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला मधल्या फळीतील बॅट्समननी हा निर्णय सार्थ ठरवला.

मधल्या फळीतील बॅट्समनना या सामन्यामुळे चांगलाच सराव मिळाला. राहुलने ९९ बॉलमध्ये ४ षटकार आणि १२ चौकार ठोकत १०८ रन्स केले. तर धोनीने ७८ बॉलमध्ये ७ षटकार आणि ८ चौकार मारून ११३ रन्स केले.