घरक्रीडाind vs eng 4th test 2021 : भारतीय संघाची जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक...

ind vs eng 4th test 2021 : भारतीय संघाची जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासुदेव परांजपेंना श्रद्धांजली

Subscribe

भारतीय संघ काळ्या आर्मबँड सह मैदानात

लंडनच्या ओवल मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये कसोटी मालिकेचा चौथा सामना सुरु झाला आहे. सामना सुरू  होण्याआधी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर दिसले. दरम्यान भारतीय खेळाडू हे काळ्या आर्मबँडसह मैदानात दिसले. परांजपे यांच्या निधनाबद्दल भारतीय संघाने वासुदेव परांजपेंना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय क्रिकेटचे अज्ञात नायक वासुदेव परांजपे यांचे नुकतेच वयाच्या ८२ व्या वर्षी मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. बीसीसीआय ने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करतही श्रद्धांजली अर्पण केली आहे. (ind vs eng 4th test 2021 : Indian Cricket Team is sporting black armbands to honour the demise of Vasudev Paranjape)

- Advertisement -

वासुदेव जतीन परांजपे यांचे वडील देखील होते. त्यांनी भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच राष्ट्रीय निवडकर्ता समितीवरही त्यांनी काम पाहिले आहेत. परांजपे यांची खेळण्याची कारकीर्द लहान असली तरीही त्यांनी मुंबई आणि बडोद्यासाठी २९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेटच्या अनेक महान क्रिकेटपटूंचे मार्गदर्शक म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला. परांजपे हे त्यांच्या कामात इतके निपुण होते की, अनेक परदेशी खेळाडूही त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत असत. यातील एक नाव इंग्लंडचा फलंदाज एडम स्मिथ हेदेखील होते. परांजपे यांच्याकडे फलंदाजी तंत्राचे ज्ञान होते. तसेच खेळाडूंकडून  सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्याची त्यांच्यात कला होती.


हेही वाचा: ind vs eng 4th test 2021: इंग्लंडने टॉस जिंकला, भारत पहिल्यांदा फलंदाजी करणार  

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -