घरक्रीडाIND vs ENG : ‘निर्णय निवड समितीचा’; गिलसाठी बदली खेळाडू पाठवण्याबाबत गांगुलीचे...

IND vs ENG : ‘निर्णय निवड समितीचा’; गिलसाठी बदली खेळाडू पाठवण्याबाबत गांगुलीचे विधान

Subscribe

गिलच्या जागी बदली खेळाडू इंग्लंडला पाठवण्यावरून सध्या भारतीय संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर असून तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, गिलच्या जागी बदली खेळाडू इंग्लंडला पाठवण्यावरून सध्या भारतीय संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. बदली खेळाडूची निवड करायची की नाही, हा निर्णय निवड समितीचा असल्याचे गांगुली म्हणाला.

ई-मेलला उत्तर नाही 

गिल पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांनी २८ जून रोजी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या वतीने राष्ट्रीय निवड समितीला ई-मेल पाठवला होता. यात त्यांनी दोन सलामीवीर इंग्लंडला पाठवण्याची आणि पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांना प्रधान्य देण्याची विनंती केली होती. परंतु, निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्याकडून त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. गिलच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून भारताकडे रोहित शर्मा, मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांचा पर्याय आहे.

- Advertisement -

शॉ-पडिक्कल श्रीलंकेत खेळणार

शॉ आणि पडिक्कल हे सध्या भारतीय संघासोबत श्रीलंकेत आहेत. श्रीलंकेत भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वात तीन एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेला १३ जुलैपासून सुरुवात होईल. तर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होईल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -