घरक्रीडाविराट वेगवान गोलंदाजी कशी खेळतो ते बघू

विराट वेगवान गोलंदाजी कशी खेळतो ते बघू

Subscribe

भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने खेळणार आहे. टी २० मालिका झाल्यावर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. तर दौर्‍याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या दौर्‍यात सार्‍यांचे लक्ष हे टीम इंडियाच्या खेळाडूंकडे असणार आहे. त्यातच कर्णधार विराट कोहली हा वेगवान गोलंदाजांचा सामना कसा करतो, ते बघू असे मत न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी व्यक्त केले आहे.

भारत-न्यूझीलंड संघांमध्ये अटीतटीचे सामने होतील अशी माझी अपेक्षा आहे. विराट कोहली या दौर्‍यात सुरूवातीच्या १०-२० चेंडूत वेगवान गोलंदाजांचा कशाप्रकारे सामना करतो हे पाहण्यात मला रस आहे. जर विराटला चांगली सुरूवात मिळाली, तर तो धमाकेदार कामगिरी करू शकतो. न्यूझीलंडच्या संघाची गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करणे खूप कठीण आहे. पण भारताकडे वेगवान गोलंदाजांचा प्रतिभावंत ताफा आहे. त्यामुळे हा दौरा खूपच रोमांचक होईल, असा विश्वास हेसन यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -