घरक्रीडावेस्ट इंडिजमध्ये बुमराचाच जलवा; रचला 'हा' इतिहास

वेस्ट इंडिजमध्ये बुमराचाच जलवा; रचला ‘हा’ इतिहास

Subscribe

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराने जबरदस्त कामगिरी केली.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नवा रेकॉर्ड रचला आहे. वेस्ट इंडिजच्या धर्तीवर कसोटी सामन्यात सहा विकेट्स घेणारा बुमराह हा पहिला गोलंदाज ठरला आहे. यामध्ये त्याने लगातर तीन विकेट्स घेऊन हॅट्रीक मारली. त्यामुळे बुमराहचा चांगलाच बोलबाला होत आहे. कसोटी सामन्यांमध्ये हॅट्रीक साकारणारा बुमरा हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. याअगोदर भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने ऑस्ट्रेलिया विरोधात खेळताना आणि इरफान पठानने पाकिस्तान विरुद्ध खेळताना हॅट्रिक साकारली होती. त्यानंतर कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराने हॅट्रिक साकारली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजचे सात गडी बाद झाले. यापैकी सहा जणांच्या विकेट्स बुमराने घेतल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या मैदानावर बुमराचाच जलवा पहायला मिळत आहे.

प्रथम फलंदाजीत भारताच्या ४१६ धावा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या फलंदाजीत ४१६ धावा केल्या. विशेष म्हणजे या सामन्यात भारताचा फलंदाज ईशांत शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक साजरी केले. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू फलंदाज हनुमा विहारीने शतक पटकावले. यामध्ये त्याला ईशांत शर्माची चांगली साथ मिळाली. दोघांनी १०० धावांची भागीदारी केली. भारताचा फलंदाज ऋषभ पंतकडे चाहत्यांच्या जास्त धावांच्या अपेक्षा होत्या. मात्र, तो दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूत बाद झाला. मात्र, हनुमान उत्कृष्ठ खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचा कामगिरी केली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी झाली. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज फार काळ टिकले नाहीत. त्यामुळे वेस्ट इंडिजची ८७ धावांवर ७व बाद अशी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे यापैकी ६ विकेट्स बुमराने घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -