घरक्रीडाभारत-पाकिस्तान सामना रंगणार; तिकिटे दोन दिवसांत संपले

भारत-पाकिस्तान सामना रंगणार; तिकिटे दोन दिवसांत संपले

Subscribe

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना १६ जून रोजी विश्वचषक स्पर्धेत रंगणार आहे. दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी सर्व तिकीटे विकत घेतले आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तान सोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने आयसीसीकडे पाकिस्तानला विश्वचषकात खेळू देऊ नका, अशी मागणी केली होता. त्यानंतर आता अखेर बीसीसीआयने आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना रंगताना दिसणार आहे. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ १६ जून २०१९ रोजी समोरासमोर खेळणार आहेत. मॅन्चेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचे तिकीटे आतापासून हाऊसफूल झाल्याचे समोर येत आहे.

फक्त सामना नाही तर रणसंग्राम

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा फक्त सामना नसून एक रणसंग्राम मानला जातो. दोन्ही देशांच्या नागरिकांचे क्रिकेटशी वेगळे असे नाते आहे. त्यामुळे हा सामना पाहण्याची मजा वेगळीच असते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील ठसण क्रिकेटच्या माध्यमातून व्यक्त होते. त्यामुळे दोन्ही देशातील घरोघरी आणि चौका-चौकांतील दुकानावरील टीव्हीवर हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा होते. हा सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी चाहत्यांनी दोन दिवसांत सर्व तिकीटे विकत घेतले आहेत. हे तिकीटे विकत घेण्यात भारतीयांची संख्या जास्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -