घरक्रीडाआयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम

Subscribe

ऑस्ट्रेलियाची गुण सरासरी ७६.६, तर भारताची ७२.२ इतकी आहे.

नुकत्याच झालेल्या मेलबर्न कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ८ विकेट राखून पराभूत केले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने या सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. रहाणेच्या नेतृत्वात भारताने अप्रतिम खेळ करत दुसरा कसोटी सामना चार दिवसांतच जिंकला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत रोखले आणि याचे उत्तर देताना रहाणेच्या शतकाच्या जोरावर ३२६ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांत आटोपल्याने भारताला ७० धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान भारताने ८ विकेट राखून गाठत सामना जिंकला. या विजयामुळे भारताला ३० गुण मिळाले असून त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद (आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप) स्पर्धेत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.

मेलबर्न कसोटीत पराभूत होऊनही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम आहे. त्यांचे एकूण ३२२ गुण असून भारताचे ३९० गुण आहेत. परंतु, ऑस्ट्रेलियाची गुण सरासरी अधिक असल्याने ते गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाची गुण सरासरी ७६.६, तर भारताची ७२.२ इतकी आहे. या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आतापर्यंत ८ सामने जिंकले असून ३ सामने गमावले आहेत. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानवर मात केली. आतापर्यंत सहा सामने जिंकणाऱ्या न्यूझीलंडचे एकूण ३६० गुण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -