घरक्रीडाIND vs ENG 3rd Test : कोहली, राहुलची नेट्समध्ये जोरदार बॅटिंग; टीम...

IND vs ENG 3rd Test : कोहली, राहुलची नेट्समध्ये जोरदार बॅटिंग; टीम इंडियाची सरावाला सुरुवात

Subscribe

तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, भारतीय संघाने या सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. हा सामना लीड्समधील हेडिंग्ले (Headingley) मैदानावर खेळला जाणार आहे. भारताच्या खेळाडूंनी याच मैदानावर घाम गाळला. भारताचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी नेट्समध्ये फलंदाजीचा जोरदार सराव केला. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, तसेच रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे फिरकीपटूही रविवारी सराव करताना दिसले. या व्यतिरिक्त रिषभ पंतने यष्टिरक्षणावर मेहनत घेतली.

आघाडी दुप्पट करण्याची संधी

भारतीय संघाला बुधवारपासून सुरु होणारा तिसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याची संधी आहे. नॉटिंगहॅम येथे झालेला या मालिकेत पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत मात्र कोहलीच्या भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ केला. पहिल्या डावात भारतीय संघ पिछाडीवर होता. परंतु, पाचव्या दिवशी वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटी सामना १५१ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

हेडिंग्लेवरील पहिलीच कसोटी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळला जाईल. भारताने या मैदानावरील अखेरचा कसोटी सामना २००२ साली खेळला होता. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंचा हा या मैदानावरील पहिलाच कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. तर दुसरीकडे डावखुरा फलंदाज डाविड मलानचे तीन वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असून हेडिंग्ले कसोटीत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – ‘हार्दिक पांड्या आयपीएल, टी-२० वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी करणारच’!

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -