घरक्रीडाIndia vs Windies, 1st ODI : विराट, रोहितचं शतक

India vs Windies, 1st ODI : विराट, रोहितचं शतक

Subscribe

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मानं शानदार शतक झळकावलं आहे. विराटचं वन डे कारकीर्दीतील ३६वं तर रोहितचं २०वं शतक ठरलं आहे.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक साजरं केलं आहे. तसेच रोहित शर्मानं देखील शानदार शतक साजरं केलं. वेस्ट इंडिजविरोधात झळकवलेलं शतक हे विराट कोहलीचं वन डे कारकीर्दीतील ३६वं शतक ठरलं आहे. तर रोहित शर्माचं हे वन डे कारकीर्दीतील २०वं शतक ठरलं आहे. गुवाहाटी वन डेमध्ये भारतासमोर ३२२ धावाचं आव्हान आहे. ३२२ धावांचा पाठलाग करायला मैदानात उरलेल्या भारताला सुरूवातीला मोठा धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ४ धावांमध्ये तंबूत परतला. पण, त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीनं रोहित शर्माच्या जोडीनं आक्रमक फटके खेळत भारतावरचा दबाव कमी केला. शिवाय, धावांची गती देखील उत्तमरित्या राखली. त्यामुळे साहजिकच इंडिजच्या गोलंदाजांवर दबाव आला. अखेर चौकार लगावत विराट कोहलीनं आपलं शतक साजरं केलं. शिखर धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली जोडीनं शानदार फटकेबाजी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -