घरक्रीडाIND vs ENG : कसोटी मालिका भारतच जिंकणार; इंग्लंडच्या 'या' माजी क्रिकेटपटूचे मत  

IND vs ENG : कसोटी मालिका भारतच जिंकणार; इंग्लंडच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत  

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होईल.

भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला ५ फेब्रुवारी म्हणजेच येत्या शुक्रवारपासून सुरुवात होईल. इंग्लंडच्या संघाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड केलेली नाही. त्यामुळे या मालिकेत भारताचे पारडे जड आहे, असे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन आणि डॉमिनिक कॉर्क म्हणाले होते. आता इंग्लंडच्या आणखी एका माजी क्रिकेटपटूने भारतीय संघ आगामी कसोटी मालिका जिंकणार असे मत व्यक्त केले आहे. भारत हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघ आहे. त्यामुळे भारतीय संघ आगामी कसोटी मालिका ३-० किंवा ४-० असा जिंकेल, असे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डेविड लॉईड म्हणाले.

भारताचे पारडे नक्कीच जड

या मालिकेत भारताचे पारडे नक्कीच जड आहे. इंग्लंडचा संघ ही मालिका जिंकेल अशी कोणालाही अपेक्षा नाही. मात्र, हीच गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडू शकेल. त्यांनी नुकतीच श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली. श्रीलंका आणि भारतातील वातावरणात साम्य आहे. परंतु, मालिका सुरु होण्यापूर्वी मला आता एक विजेता निवडायचा असल्यास मी भारताचे नाव घेईन, असे लॉईड यांनी इंग्लंडमधील एका वृत्तपत्रात लिहिले.

- Advertisement -

भारताचा संघ संतुलित

भारत हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघ आहे आणि हे त्यांनी ऑस्ट्रेलियात दाखवले. त्या मालिकेत त्यांचा कर्णधार विराट कोहली खेळला नव्हता. मात्र, याचा त्यांच्या संघावर परिणाम झाला नाही. त्यांचा संघ संतुलित असून त्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाज आहेत. माझ्या मते, भारतीय संघ ही कसोटी मालिका ३-० किंवा ४-० असा जिंकेल. मात्र, मला इंग्लंडच्या संघाने चुकीचे ठरवले तर आनंद होईल, असेही लॉईड यांनी नमूद केले.


हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -