घरक्रीडाIND vs ENG 1st ODI : धवनचे शतक थोडक्यात हुकले, स्टोक्सने पाठवले माघारी 

IND vs ENG 1st ODI : धवनचे शतक थोडक्यात हुकले, स्टोक्सने पाठवले माघारी 

Subscribe

धवनचे भारतीय संघातील स्थान धोक्यात असल्याचे म्हटले जात होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी (आज) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन या सामन्यामध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. धवनचे भारतीय संघातील स्थान धोक्यात असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण होते. त्याने या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. मात्र, त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्याने १०६ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९८ धावांची खेळी केली.

६८ चेंडूत केले अर्धशतक

धवनला नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. पहिल्या टी-२० सामन्यात ४ धावांची खेळी केल्यानंतर त्याला उर्वरित चार सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले होते. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनने अप्रतिम फलंदाजी केली. डावाच्या सुरुवातीला सावध फलंदाजी केल्यानंतर त्याने धावांची गती वाढवली. त्याने ६८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर पुढील ४७ धावा त्याने केवळ ३८ चेंडूत केल्या. मात्र, ९८ धावांवर असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पूलचा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्यामुळे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील १८ वे शतक केवळ दोन धावांनी हुकले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -