घरक्रीडाकरोनाबाबत खबरदारी घेऊन आयपीएल वेळेवरच होणार!

करोनाबाबत खबरदारी घेऊन आयपीएल वेळेवरच होणार!

Subscribe

सौरव गांगुलीची माहिती

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा ठरलेल्या वेळीच सुरु होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली. जगभरात करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतामध्ये ३१ करोनाचे रुग्ण आढळले असून यापैकी १६ इटलीमधून आलेले पर्यटक होते. करोनाच्या धोक्यामुळेच आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकेल अशी चर्चा होत होती. मात्र, या चर्चांना गांगुलीने पूर्णविराम दिला आहे. आयपीएल २९ मार्चपासूनच सुरु होणार असल्याचे त्याने सांगितले.

आयपीएल ठरलेल्या वेळीच सुरु होईल. इतर ठिकाणीही विविध स्पर्धा सुरु आहेत. इंग्लंड श्रीलंकेच्या दौर्‍यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला आहे. कौंटी संघ विविध देशांमध्ये खेळायला जात आहेत. ते अबू धाबी, दुबईत खेळत आहेत. त्यामुळे खेळाडूंना इथे खेळण्यात काहीही अडचण असेल असे मला वाटत नाही. आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ. करोनासाठी आणखी काय खबरदारी घ्यावी लागते हे मला नक्की माहित नाही. या गोष्टी आमची वैद्यकीय टीम ठरवेल. डॉक्टर जे सांगतील, ते आम्ही करु. मात्र, भारतातील प्रत्येक स्पर्धा होणार हे निश्चित, गांगुलीने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -