घरक्रीडाभारतीय संघ विराट,रोहितवर अवलंबून!

भारतीय संघ विराट,रोहितवर अवलंबून!

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत तो भारताचा सर्वात प्रमुख फलंदाज आहे. उपकर्णधार रोहित शर्मा खासकरुन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत विराटला चांगली साथ देत आहे. त्यामुळे सध्याचा भारतीय संघ या दोघांवर खूप अवलंबून आहे, असे मत भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून रोहित आणि हरभजन यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

तू जेव्हा खेळायचास तेव्हाचा भारतीय संघ आणि आताचा संघ यात काय फरक आहे, असे रोहितने विचारले असता हरभजन म्हणाला की, सध्याचा संघ विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंवर जास्तच अवलंबून आहे. या संघात बरेच प्रतिभावान खेळाडू आहेत, पण त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. विराट आणि रोहित लवकर बाद झाले, तर ७० टक्के सामने आपण गमावतो.

- Advertisement -

आमच्या वेळी, आघाडीच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले तरी युवराज सिंग किंवा राहुल द्रविड सामना जिंकवेल असा आम्हाला विश्वास होता. त्यामुळे आताच्या भारतीय संघाला आणखी मॅचविनर्सची गरज आहे. तू (रोहित) विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केलीस, पण भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. मात्र, जर ३-४ खेळाडू चांगली कामगिरी करत असते, तर कदाचित आपण विश्वचषक जिंकला असता.

मुंबई-चेन्नईत बराच फरक!
हरभजन सिंग आयपीएलमध्ये पहिली दहा वर्षे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला, तर मागील दोन मोसम त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले. मुंबई आणि चेन्नई हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानले जातात. या दोन संघांमधील फरकाविषयी हरभजन म्हणाला, दोन संघांमध्ये खूप फरक आहे. मुंबईत सराव, संघाची बैठक अशी प्रत्येक गोष्ट वेळेनुसारच होते. इथे सर्व व्यावसायिक पद्धतीने होते. मी मुंबईकडून दहा वर्षे खेळलो आणि इथे थोडा दबाव जाणवायचा. मात्र, मागील दोन मोसम मी चेन्नईकडून खेळत आहे आणि हा संघ फार ताण घेत नाही. आमच्या फार बैठका होत नाही. सर्व गोष्टी खेळाडूंनी स्वतः जबाबदारीने करायच्या असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -