घरक्रीडाAsian games 2018: तब्बल २० वर्षांनी महिला हॉकी संघ अंतिम फेरीत

Asian games 2018: तब्बल २० वर्षांनी महिला हॉकी संघ अंतिम फेरीत

Subscribe

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. तब्बल २० वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश मिळवून भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिवसेंदिवस उत्तमोत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये भारतीय महिला हॉकी संघही मागे नाही. भारताच्या महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. तब्बल २० वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश मिळवून भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. यापूर्वी १९९८ साली भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरी जाण्याचा मान पटकावला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी, बुधवारी भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा १-० ने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

- Advertisement -

अंतिम सामन्यात जपानशी लढत

आता भारतीय महिला हॉकी संघाचा सामना अंतिम सामन्यात जपानशी लढत होणार असून दोन्ही संघ सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणार आहेत. हा सामना शुक्रवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. उपांत्य फेरीतील लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने चांगली कामगिरी केली यावेळी भारतीय संघाकडून गुरजीत कौरने एकमेव गोल करत भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. भारतीय आणि क्रीडाप्रेमी या महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवण्याची आशा व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -