घरदेश-विदेशदेश हूकूमशाहीच्या वाटेवर; लालू प्रसाद यादव यांची सरकारवर टीका

देश हूकूमशाहीच्या वाटेवर; लालू प्रसाद यादव यांची सरकारवर टीका

Subscribe

न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण भरोसा असून आज नाही तर उद्या न्याय नक्की मिळेल', असे लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झालेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव पटनावरुन रांचीला रवाना झाले आहे. उद्या सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर ते आत्मसमर्पण करण्यासाठी रांचीला रवाना झाले आहेत. रांचीला जाण्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

- Advertisement -

देश हूकूमशाहीच्या वाटेवर

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयारून पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर लालू प्रसाद यादव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे. पाच विचारवंतांच्या अटक स्पष्ट करते की, ही आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि मी त्याचा निषेध करतो.’ असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा

लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाची मुदत २० ऑगस्ट रोजीच संपली आहे. ही जामीनाची मुदत आणखी तीन महिने वाढवावी. अशी विनंती लालूप्रसाद यादव यांनी केली होती. मात्र न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावली. उद्या म्हणजे ३० ऑगस्टला त्यांना न्यायालयासमोर आत्मसमर्पण करायचे आहे. त्यासाठी ते आज रांचीला रवाना झाले. रुग्णालयात आराम करण्याची हौस नाही. ‘न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण भरोसा असून आज नाही तर उद्या न्याय नक्की मिळेल’, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -