IPL 2018 1st SEMI FINAL LIVE UPDATE

carlos
कार्लोस ब्रेथवाइट

आज क्वालिफायर १ चा पहिला सामना वानखेडेला सुरु आहे. ज्यात चेन्नई विरुद्ध हैद्राबाद असा सामना रंगला आहे. चेन्नई आणि हैद्राबाद हे दोन्ही संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी आहेत. दोन्ही संघाचा या आयपीएल मधील प्रदर्शन अत्यंत अप्रतिम असून आज अंतिम सामन्यासाठी पोहचण्याकरिता यांच्यात लढाई सुरु आहे दरम्यान आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या संघात सॅम बिलिंग्ज ऐवजी शेन वॉटसनला जागा मिळाली आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा होणार असून यात कोण बाजी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हैद्राबादकडून चेन्नईसाठी १४० रनाचे लक्ष्य कार्लोसची एकाकी नाबाद ४३ रनांची झुंज

शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर धोनीकडून रन आऊट

कार्लोस ब्रेथवाइटची एकाकी झुंज सुरु

ब्राव्होला आणखी एक यश युसूफ पठाणला पाठवले माघारी

ब्राव्होने शाकीब अल हसनचा विकेट घेत संघाला आणखी एक यश,

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर कप्तान केन विल्यमसन आउट

केन विल्यमसन-श्रीवत्स गोस्वामी संघाला सावरत असताना लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर गोस्वामी आउट

शिखर धवन पहिल्याच चेंडूवर आउट , दिपक चहरने घेतला पहिला बळी

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय