घरक्रीडाDC vs RCB: विराट सेना नमली; दिल्लीचा प्ले-ऑफमधील प्रवेश निश्चित

DC vs RCB: विराट सेना नमली; दिल्लीचा प्ले-ऑफमधील प्रवेश निश्चित

Subscribe

दिल्लीने १६ धावंनी बंगळुरुवर मात करत प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. चेन्नई पाठोपाठ आता दिल्लीचे देखील गुण १६ झाले आहेत.

दिल्लीने विराट सेनेचा पराभव करत प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित केले आहे. रविवारी दिल्ली आणि बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मोसमातील ४६ वा सामना खेळला गेला. या सामन्यात बंगळुरुने दिल्लीला चांगली टक्कर दिल्ली. मात्र दिल्लीने मोठ्या चतुराईने बंगळुरुवर १६ धावांनी मात केली. दिल्लीने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीचा हाच निर्णय योग्य ठरला. दिल्लीने बंगळुरुला १८८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान पूर्ण करण्यात बंगळुरु अपयश ठरले. बंगळुरु फक्त १७१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा सामोरे जाताना बंगळुरुची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. पार्थिव पटेलने आक्रमक खेळी खेळत २० चेंडूत ३९ धावा केल्या. यामध्ये पटलने ७ चौकार तर १ षटकार मारला. परंतु, कॅगिसो रबाडेने त्याला बाद केले. यानंतर बंगळुरुला उतरती कळाच लागली. विशिष्ट धावांच्या अंतरावर मधल्या फळीचेही फलंदाज बाद झाले. त्यामुळे बंगळुरु १८८ धावांपर्यंत मजल मारु शकला नाही. २० षटकांत बंगळुरुने ७ बाद १७१ धावा केल्या.

- Advertisement -

दरम्यान, प्रथम फलंदाजासाठी आलेल्या दिल्लीची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ स्वस्तात तंबूत परतला. त्याने १० चेंडूत १८ धावा केल्या. परंतु, सलामीवीर शिखर धवनने आपले अर्धशतक पटकावले. त्याने ३७ चेंडूत ५० धावा केल्या. त्यानंतर उंच फटका मारण्याच्या नादात शिखर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरनेही अर्धशतक पटकावले. मात्र, उंच फटका मारण्याच्या नादात तो देखील बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ५२ धावा केल्या. यानंतर रिषभ पंत आणि कुलिन इन्ग्राम काही धावांच्या अंतरावर बाद झाले. शेवटच्या षटकांत रुदरफोर्ड आणि अक्सार पटेलने जोरदार फटकेबाजी करत दिल्लीला १८७ धावांपर्यंत पोहोचवले. दिल्लीने २० षटकात ५ बाद १८७ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -