घरक्रीडाIPL 2020: बीसीसीआयला धक्का; CSK च्या गोलंदाजासह १२ जण कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2020: बीसीसीआयला धक्का; CSK च्या गोलंदाजासह १२ जण कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

कोरोना काळात आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु करण्याचे धाडस करणाऱ्या बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका गोलंदाजाला आणि सपोर्ट स्टाफ, सोशल मीडिया टीम अशा १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची तब्येत स्थिर आहे. त्यांना नियमाप्रमाणे विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाही आहेत.

यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. चेन्नईचा संघही या सर्व नियमांचे पालन करत होता. चेन्नईच्या संघाने दुबईत दाखल झाल्यानंतर ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. मात्र, संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे चेन्नईच्या संघाने सरावाला सुरुवात केलेली नाही आहे.

- Advertisement -

दुबईतील अनिवार्य चाचणी कालावधीच्या पहिल्या आणि तिसऱ्या दिवसाच्या चाचणीत खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले. बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार, युएईमध्ये आगमन झालेल्या खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि सहाव्या दिवशी अशी तीनवेळा चाचणी केली जाणार आहे. या तीन यशस्वी चाचण्यानंतर खेळाडूंना बायोसीक्यूअर बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -