घरक्रीडाRR vs CSK: आज धोनीच्या नावावर होऊ शकतात 'हे' तीन विक्रम

RR vs CSK: आज धोनीच्या नावावर होऊ शकतात ‘हे’ तीन विक्रम

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग (IPL)चा आज चौथा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन्ही संघामध्ये शारजाहमध्ये रंगणार आहे. आयपीएलच्या तेराव्या मोसमात सीएसकेचा हा दुसरा सामना असेल तर राजस्थान रॉयल्सचा आजचा पहिला सामना असणार आहे. पहिल्याच सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा पराभव केले. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने पहिला स्पर्धात्मक सामना खेळला. धोनीने सलामीच्या सामन्यात दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. आता आजच्या सामन्यात धोनीच्या नावावर तीन नवीन विक्रम होऊ शकतात. कोणते ते जाणून घ्या.

धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने तीन आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. त्यामुळे धोनीला जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जाते. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सविरुद्ध जेव्हा धोनी मैदानात उतरेल तेव्हा षटकारांचा (सिक्स) विक्रम आपल्या नावावर करू शकतो. धोनीच्या खात्यात आता २९५ आईपीएल सिक्स आहेत, त्याला ३००चा टप्पा पार करण्यासाठी ५ सिक्सची गरज आहे. धोनीच्या व्यतिरिक्त असे दोन भारतीय फलंदाज आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये ३०० हून अधिक सिक्स मारले आहेत. आयपीएलमध्ये रोहित शर्माने ३६१ सिक्स मारले असून सुरेश रैनाने ३११ सिक्स मारले आहेत.

- Advertisement -

धोनीने आयपीएलमध्ये १०० कॅच घेतल्या आहेत. जर आजच्या सामन्यात धोनीने तीन कॅच घेतल्या तर तो सुरेश रैनाला मागे टाकेल. आयपीएलमध्ये सुरेश रैनाने १०२ कॅच घेतल्या आहेत. यष्टिरक्षक (विकेटकीपर) म्हणून धोनीने ९६ कॅच घेतल्या आहेत. अजून चार यष्टिरक्षक म्हणून कॅच धोनीने घेतल्या तर तो आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक कॅच घेणारा दुसरा खेळाडू ठरले. कारण दिनेश कार्तिकने यष्टिरक्षक म्हणून १०१ कॅच घेतल्या आहेत. धोनीने १९१ आयपीएल सामन्यात ४२.२१ च्या सरासरीने ४ हजार ४३२ धावा काढल्या आहेत. धोनीला ४ हजार ५००चा आकडा गाठण्यासाठी ६८ धावा काढण्याची गरज आहे.


हेही वाचा – अनुष्काचा हॉट फोटो ठरला विराटचा लकी चार्म; पहिल्याच सामन्यात विजयी सलामी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -