घरIPL 2020MI vs RCB Live Update : RCB चा सुपरओव्हरमध्ये विजय

MI vs RCB Live Update : RCB चा सुपरओव्हरमध्ये विजय

Subscribe

आज आयपीएल स्पर्धेत मुंबई विरुद्ध बंगळुरू असा सामना होत आहे. 

सुपरओव्हरमध्ये RCB ने मुंबईला पराभूत केलं.


सामना बरोबरीत, सुपरओव्हरमध्ये लागणार निकाल

- Advertisement -

९९ धावांवर किशन बाद, एका धावेमुळे शतक हुकलं


इशान किशनचं अर्धशतक, मुंबईची झुंज सुरुच

- Advertisement -

अखेरच्या षटकांत एबी डिव्हिलियर्स (२४ चेंडूत नाबाद ५५) आणि शिवम दुबे (१० चेंडूत नाबाद २७) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे आरसीबीने २० षटकांत ३ बाद २०१ अशी धावसंख्या उभारली.


पडिक्कलने चांगली फलंदाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावले. त्याने ४० चेंडूत ५४ धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक ठरले.


विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये चांगला खेळ करण्यात पुन्हा एकदा अपयश आले. अवघ्या ३ धावांवर त्याला राहुल चहरने बाद केले.


फिंच ५२ धावा करुन बाद. ट्रेंट बोल्टने पाठवले माघारी.


आरसीबीचा सलामीवीर फिंचने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे आरसीबीकडून खेळताना त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले.


आरसीबीचे सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि फिंच यांनी डावाची दमदार सुरुवात केली. त्यामुळे पॉवर-प्लेनंतर (६ षटके) आरसीबीची बिनबाद ५९ अशी धावसंख्या होती.


मुंबईच्या संघात एक बदल, सौरभ तिवारीच्या जागी ईशान किशन.


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.


आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना होत आहे. दोन्ही संघांचा हा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना असून दोन्ही संघांनी एक सामना जिंकला, तर एक सामना गमावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -