Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : धोनी विरुद्ध पंत! आज चेन्नईची टक्कर दिल्ली कॅपिटल्सशी

IPL 2021 : धोनी विरुद्ध पंत! आज चेन्नईची टक्कर दिल्ली कॅपिटल्सशी

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा पंतचा पहिलाच सामना असणार आहे.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंत हे गुरु-शिष्य आमनेसामने येणार आहेत. आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होणार असून दोन्ही संघांचे विजयी सुरुवातीचे लक्ष्य असेल. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा पंतचा पहिलाच सामना असणार आहे. ‘मी धोनीविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण करण्यास उत्सुक आहे. मी त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो आहे,’ असे काही दिवसांपूर्वी पंत म्हणाला होता. त्यामुळे या सामन्याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष आहे.

जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न 

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत यंदा पंत दिल्लीचे नेतृत्व करेल. दिल्लीने मागील वर्षी आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, मुंबई इंडियन्सच्या हातून पराभूत झाल्याने दिल्लीची जेतेपदाची कोरीच राहिली. यंदा पंतच्या नेतृत्वात जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. दिल्लीच्या संघात पंतसह शिखर धवन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि स्टिव्ह स्मिथ असे चांगले फलंदाज आहेत. धवनने मागील वर्षी अप्रतिम कामगिरी करताना ६१८ धावांची खेळी केली होती. तसेच या संघात कागिसो रबाडा, उमेश यादव, एन्रिच नॉर्खिया या वेगवान गोलंदाजांसह मार्कस स्टोईनिस, अश्विनआणि अक्षर पटेल या अष्टपैलूंचा समावेश आहे.

रैनाचे चेन्नई संघात पुनरागमन

- Advertisement -

चेन्नईची भिस्त कर्णधार धोनीसह सुरेश रैना आणि रविंद्र जाडेजा या अनुभवी खेळाडूंवर असेल. रैना मागील वर्षी या स्पर्धेत खेळला नव्हता. रैनाने आतापर्यंत चेन्नईकडून सर्वाधिक ५,३६८ धावा केल्या असून त्याच्या पुनरागमनामुळे चेन्नईचा संघ मजबूत झाला आहे. तसेच मागील मोसमात दमदार कामगिरी करणारे ऋतुराज गायकवाड आणि सॅम करन हे यंदा खेळात सातत्य दाखवतील अशी चेन्नईला आशा असेल.

- Advertisement -