घरक्रीडाIPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडू उर्वरित मोसमात खेळणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO म्हणाले...

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडू उर्वरित मोसमात खेळणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO म्हणाले…

Subscribe

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा क्वारंटाईनचा कालावधी सोमवारी संपला.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या उर्वरित मोसमात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत पार पडणार आहे. शनिवारी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा झाली. या सभेत आयपीएल याचवर्षी खेळवण्याचा निर्णय झाला. परंतु, ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या स्पर्धेतील सहभागाबाबत अजून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चर्चा केलेली नाही. याबाबतची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निक हॉकली यांनी दिली आहे. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. आता उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

विंडीज दौऱ्यावर लक्ष केंद्रित केले 

आम्ही सर्व एकत्र आल्यावर आयपीएल स्पर्धेबाबत नक्कीच चर्चा करू. आयपीएल स्थगित झाल्यावर मायदेशी परतलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू आताच क्वारंटाईनमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून देण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. तसेच आमचा संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्याची तयारी करण्यावरही आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे आयपीएलबाबत अजून निर्णय झालेला नाही, असे हॉकली म्हणाले.

- Advertisement -

कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक 

तसेच यंदा आयपीएल स्पर्धेतील अनुभव खेळाडूंसाठी वेगळा होता, असेही हॉकली यांनी सांगितले. यंदा आयपीएलमध्ये आलेल्या अनुभवाने खेळाडूंना थोडा धक्का बसला आहे. त्यामुळे ते घरी परतून आनंदी आहेत. ते आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक असल्याचे हॉकली म्हणाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा क्वारंटाईनचा कालावधी सोमवारी संपला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -