घरक्रीडाIPL 2022 : लखनऊ फ्रँचायझीच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी विजय दहिया; KKR ने...

IPL 2022 : लखनऊ फ्रँचायझीच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी विजय दहिया; KKR ने त्यांच्या कार्यकाळात दोनदा जिंकला होता किताब

Subscribe

आगामी आयपीएल २०२२ च्या पार्श्वभूमीवर लखनऊ फ्रँचायझीने आपल्या प्रशिक्षक स्टाफला मजबूत करण्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे

आगामी आयपीएल २०२२ च्या पार्श्वभूमीवर लखनऊ फ्रँचायझीने आपल्या प्रशिक्षक स्टाफला मजबूत करण्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी हंगाम पाहता फ्रँचायझीने भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय दहिया यांची संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर मागील आठवड्यात लखनऊच्या फ्रँचायझीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि शानदार फलंदाज अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरकडे फ्रँचायझीने मेंटॉरची जबाबदारी सोपवली आहे.

आयपीएलचा नवीन संघ असलेल्या लखनऊ फँचायझीने सहाय्यक प्रशिक्षक पद दिल्याबद्दल विजय दहिया यांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

विजय दहिया यांनी म्हटले की, “मला लखनऊ आयपीएल फ्रँचायझीसोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आनंदी आहे आणि फँचायझीचा आभारी आहे.” विजय दहिया यांनी भारताकडून दोन कसोटी आणि १९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आरपीएसजीचा भाग असलेल्या लखनऊ संघाने यापूर्वी अँडी फ्लॉवरला संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि गौतम गंभीरची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.

यूपीच्या संघासोबतच काम करत आहेत दहिया

हरियाणाचे राहणारे ४८ वर्षीय दहिया हे उत्तर प्रदेश संघाचे सध्याचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) या दोन वेळा आयपीएल विजेत्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तर त्यांनी दिल्ली रणजी संघाला प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळाडूंची प्रतिभा पाहण्यासाठी ‘टॅलेंट स्काउट’ म्हणूनही काम केले आहे.

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -