घरपालघरमोखाड्यात सर्वाधिक ८४ टक्के मतदान; विक्रमगडमध्ये ७९.३४ तर तलासरीत ७५ टक्क्यांची नोंद

मोखाड्यात सर्वाधिक ८४ टक्के मतदान; विक्रमगडमध्ये ७९.३४ तर तलासरीत ७५ टक्क्यांची नोंद

Subscribe

मोखाड्यात सर्वाधिक ८४ टक्के मतदान झाले. त्या खालोखाल विक्रमगडमध्ये ७९.३४ तर तलासरीत ७५ टक्के मतदान झाले. विक्रमगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याने १४ जागांसाठी निवडणूक झाली.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा आणि तलासरी नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी काही किरकोळ घटना वगळता मतदान अगदी शांततेत पार पडले. मोखाड्यात सर्वाधिक ८४ टक्के मतदान झाले. त्या खालोखाल विक्रमगडमध्ये ७९.३४ तर तलासरीत ७५ टक्के मतदान झाले. विक्रमगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याने १४ जागांसाठी निवडणूक झाली. त्यासाठी ७९.३४ टक्के मतदान झाले. तलासरी आणि मोखाड्यात सर्व १७ जागांसाठी मतदान झाले. मोखाड्यात सत्ताधारी शिवसेना स्वतंत्रपणे लढत होती. निलेश सांबरे यांच्या आघाडीने भाजपशी युती केली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडीने युती करून उमेदवार मैदानात उतरवले होते.

विक्रमगडमध्ये सांबरे यांच्या विक्रमगड विकास आघाडीने श्रमजीवी संघटनेशी युती केली होती. आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांना पुन्हा सत्ता मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याही ठिकाणी शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरली आहे. तलासरीत सत्ताधारी माकपविरोधात आघाडी होऊ शकली नाही. याही ठिकाणी शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाचा फटका

मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी नगरपंचायत निवडणुकीत एकही ओबीसी आरक्षित जागा नाही. त्यामुळे सर्वच जागांवर निवडणूक पार पडली. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार या तिनही नगरपंचायतींची मतमोजणी इतर नगरपंचायतींच्या १९ जानेवारी २२ रोजीच होणार आहे.

मतमोजणीपर्यंत आचारसंहिता

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मतमोजणीच्या तारखेपर्यंत अर्थात १९ जानेवारी २२ पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्याचाही फटका मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी नगरपंचायतीला बसला आहे. मतमोजणी होईपर्यंत प्रशासकीय राजवटही असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मी जे बोलत होतो माफी मागणार नाही, ते बरोबर, त्यांनी जरूर हक्कभंग आणावा, भास्कर जाधव आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -