घरक्रीडाRohit Sharma : MI मालक आणि 'मुंबई'चा राजा हिटमॅनचा एकाच गाडीतून प्रवास;...

Rohit Sharma : MI मालक आणि ‘मुंबई’चा राजा हिटमॅनचा एकाच गाडीतून प्रवास; पडद्यामागे काही घडतंय?

Subscribe

मुंबई इंडियन्सचा सहमालक आकाश अंबानी आणि रोहित शर्मा एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. त्यांचा सोशल मीडियावर त्या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई : यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीसाठी काही गोष्टी मनासारख्या घडताना दिसत नाही आहे. मुंबई इंडियनला आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये फक्त एक सामना जिंकता आला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियनचा माजी कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन मालकांवर चाहते टीका करताना दिसत आहेत. तसेच रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करण्याची मागणीही होताना दिसत आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सचा सहमालक आकाश अंबानी आणि रोहित शर्मा एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. त्यांचा सोशल मीडियावर त्या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (IPL 2024 Mumbai Indians co owner Akash Ambani and Rohit Sharma travel in the same train)

मुंबई इंडियन फ्रँचायझीने 2022 च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला ड्रॉप केलं होतं. त्यानंतर गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवत त्याला संघात स्थान दिले आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. हार्दिकचा गुजरातसोबतचा दोन वर्षांचा प्रवास चांगला राहिला. त्यांच्या नेतृत्वात गुजरात संघाने 2022 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर दुसऱ्या हंगामात म्हणजेच 2023 मध्ये गुजरात टायटन्स संघ उपविजेता ठरला. त्यामुळे मुंबई इंडियनने त्यांच्यावर विश्वास दाखवत आपल्या संघाता सामील करून घेतले आणि रोहित शर्माला बाजूला करत त्यांच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली. मात्र यामुळे वाद निर्माण झाला.

- Advertisement -

हेही वाचा – MI vs RCB IPL 2024 : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यांमध्ये मुंबईचं पारडं जड; पाहा हेड टू हेड आकडेवारी

  

- Advertisement -

हार्दिककडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे रोहितच्या चाहत्यांची निराशा झाली. रोहित आणि हार्दिक यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या बातम्याही समोर येऊ लागल्या. रोहित शर्मा मुंबई इंडियन संघ सोडू शकतो, अशी चर्चा रंगली होती. मात्र रोहित शर्मा मुंबई इंडियनसोबतचा राहिला. असे असले तरी हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियनने पहिले 3 सामने सलग हरले. त्यामुळे मुंबई इंडियनच्या चाहत्यांसह मालकही प्रचंड नाराज झाले होते. रोहित शर्माकडे पुन्हा मुंबई इंडियनची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी होताना दिसत आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सचा सहमालक आकाश अंबानी रोहित शर्मासोबत एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले.

आकाश अंबानी स्वतः गाडी चालवत बुधवारी (10 एप्रिल) रात्री रोहितला वानखेडे स्टेडियमवर घेऊन जाताना दिसला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आकाश अंबानी गाडी चालवत आहे, तर रोहित शर्मा त्याच्या बाजूच्या सीटवर बसला आहे. आकाश अंबानी आणि रोहित ज्या पद्धतीने गाडीमध्ये एकत्र दिसले ते पाहून मुंबई इंडियन फ्रँचायझी रोहित शर्माला नाराज असलेल्या रोहित शर्माला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे का? तसेच भविष्यात त्याची संघात काय भूमिका असेल? अशी चर्चा आता रंगली आहे.

हेही वाचा – MI vs RCB Playing XI : प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी मुंबई-बंगळुरूच्या संघाच बदल निश्चित; अशी असेल प्लेईंग 11

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -