घरक्रीडाMI vs RCB IPL 2024 : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यांमध्ये मुंबईचं पारडं जड; पाहा...

MI vs RCB IPL 2024 : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यांमध्ये मुंबईचं पारडं जड; पाहा हेड टू हेड आकडेवारी

Subscribe

IPL 2024 आयपीएलच्या 17 पर्वाच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

mumbai indians vs royal challengers bangluru stats : आयपीएलच्या 17 पर्वाच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबईने चार सामन्यात एक विजय मिळवला आहे तर, बंगळुरूने पाच सामन्यांमध्ये एक विजय मिळवला आहे. त्यामुळे प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. पण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे पारडं बंगळुरूच्या विरोधात जड राहिले आहे. त्यामुळे मुंबई आजच्या सामन्यात कशी खेळी करते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. (mumbai indians vs royal challengers bangluru stats today match at wankhede playing 11)

मुंबई इंडियन्स आयच्या सामन्यात दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. पण हेड टू हेड पाहिल्यास मुंबईला बंगळुरूचा पराभव करणे शक्य नाही. कारण हेड टू हेड आकडेवारीत मुंबईचे पारडे जड आहे. याआधी बंगळुरूने पाच सामन्यात मुंबईता पारभव केला आहे. परंतू, आयपीएलच्या 16 व्या पर्वातील अखेरच्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा पराभव केला होता. त्यामुळेच मुंबईचे पारडं जड बंगळुरूसमोर जड आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024 MI vs RCB Match Scorecard: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू; विराट- रोहित आमनेसामने

याशिवाय, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 32 सामने झाले आहेत. या 32 सामन्यांपैकी 18 सामन्यांमध्ये मुंबईने बाजी मारली आहे, तर 14 सामन्यांत बंगळुरूने विजय मिळवला आहे. शिवाय, आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबईने पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. पण बंगळुरूला एकही जतेपद पटकावता आले नाही. बंगळुरूने आतापर्यंत तीन वेळा अंतिम सामन्यामध्ये धडक मारली, पण पदरी निराशाच आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MI vs RCB Playing XI : प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी मुंबई-बंगळुरूच्या संघाच बदल निश्चित; अशी असेल प्लेईंग 11

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -