घरक्रीडाIPL 2024 : राजस्थानकडून मुंबई दुसऱ्यांदा पराभूत, शिल्पा शेट्टीचा संघ अव्वलच

IPL 2024 : राजस्थानकडून मुंबई दुसऱ्यांदा पराभूत, शिल्पा शेट्टीचा संघ अव्वलच

Subscribe

यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा राजस्थानच्या संघाकडून मुंबईचा पराभव करण्यात आला. जयपूर येथील सवाई मानसिंघ इंदूर स्टेडियममध्ये हा सामना खेळवला गेला.

जयपूर : आयपीएल 2024 मधील 38वा सामना हा सोमवारी (ता. 22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. यावेळी यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा राजस्थानच्या संघाकडून मुंबईचा पराभव करण्यात आला. जयपूर येथील सवाई मानसिंघ इंदूर स्टेडियममध्ये हा सामना खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या संघाने राजस्थानसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करत बटलर आणि यशस्वी या खेळाडूंच्या जोडीने उत्कृष्ट सुरुवात करून दिली आणि ज्याचा फायदा राजस्थानच्या संघाला झाला. ज्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा संघ अव्वल ठरला आहे. (IPL 2024: Mumbai Indians lost second time against Rajasthan Royals)

राजस्थान रॉयल्सविरोधात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय संघासाठी योग्य ठरला नाही, कारण मुंबईला सुरूवातीलाच तीन मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 9 बाद 189 धावा केल्या. रोहितने पहिल्या षटकात एक चौकार मारला पण त्यानंतर बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर दुसऱ्या षटकात इशान किशन खाते न माघारी परतला. तर सूर्यकुमार यादवही केवळ 10 धावा करून बाद झाला. यानंतर आलेला मोहम्मद नबीने एका षटकात 17 धावा करत मुंबईला पॉवरप्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारून दिली.

- Advertisement -

हेही वाचा… RCB Playoffs Equation: आठ मॅच हरुनही RCB ला मिळणार प्लेऑफचे तिकीट? हे आहे समीकरण

मुंबईच्या दोन युवा फलंदाजांनी मुंबईचा डाव सावरला आणि महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिलक वर्मा आणि नेहल वधेराने 99 धावांची भागीदारी करत मुंबईच्या धावसंख्येत चांगली वाढ केली. तर, तिलक वर्माने सुद्धा उत्कृष्ट असे अर्धशतक झळकावले आणि 45 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 65 धावा काढल्या. तर नेहलने 24 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांसह 49 धावा केल्या. यानंतर तिलक बाद होताच मुंबईचे तीन खेळाडून लागोपाठ बाद झाले. ज्यामुळे अखेरच्या षटकात मुंबईला केवळ तीनच धावा करता आल्या. तर बोल्टने 2 विकेट आणि आवेश, चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. या विकेटसह चहलने आयपीएलमध्ये आपले 200 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

- Advertisement -

यानंतर, राजस्थानच्या संघाने 190 धावांचा पाठलाग करत उत्तम खेळी केली. पॉवरप्लेपर्यंत बटलर आणि यशस्वीने शानदार खेळी करत 61 धावांचा डोंगर उभारला. यानंतर अचानक राजस्थानमध्ये पावसाला सुरूवात झाली. बराच काळ पावसामुळे थांबलेल्या सामन्यामध्ये डीएलएसनुसारही राजस्थानचा संघ पुढे होता. पुन्हा सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात पियुष चावलाने बटलरला क्लीन बोल्ड केले. बाद होण्यापूर्वी बटलरने 25 चेंडूत 6 चौकार लगावत 35 धावा केल्या.

मुंबई विरोधातील सामन्यात यशस्वीने यशस्वी कामगिरी करत अवघ्या 31 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यानंतर शतकी खेळी करत नाबाद राहिला. यशस्वीला साथ देत संजूने 28 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 38 धावा केल्या. यशस्वीच्या फटकेबाजीमुळे इतर कोणत्याही फलंदाजाला फलंदाजीला येण्याची गरजच भासली नाही. मुंबईकडून फक्त पियुष चावलाला एक विकेट घेण्यात यश आले. त्यामुळे आता गुणतालिकेत राजस्थानचा संघ 14 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे, तर सहा गुणांसह मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -