घरक्रीडाIPL auction: 'या' परदेशी खेळाडूंनी केली कोट्यवधीची कमाई

IPL auction: ‘या’ परदेशी खेळाडूंनी केली कोट्यवधीची कमाई

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील मोसमाआधी गुरुवारी (आज) कोलकाता येथे खेळाडू लिलाव होत आहे. या लिलावात एकूण ३३२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात बऱ्याचशा प्रमुख भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर बोली लागली असून ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला तब्बल १५.५ कोटी रुपये इतकी रक्कम मोजत कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल पुढील मोसमात पुन्हा किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दिसेल. मॅक्सवेलवर पंजाबने १०.७५ कोटी इतकी बोली लावली. भारतीय खेळाडूंमध्ये अनुभवी रॉबिन उथप्पाला राजस्थान रॉयल्स संघाने २.८० कोटी रुपयांत खरेदी केले.


हेही वाचा – आयपीएल लिलाव : हेटमायर, बँटन, उथप्पावर लक्ष

- Advertisement -

कमिन्ससाठी कोलकाता, बंगळुरू, दिल्लीत चढाओढ

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला आपल्या संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, २ कोटींची मूळ किंमत असलेल्या कमिन्सला अखेर १५.५ कोटी रुपयांत कोलकात्याने खरेदी केले. कमिन्स हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत ७७ टी-२० सामन्यांत ९२ विकेट्स मिळवल्या आहेत. आयपीएलमध्ये याआधी त्याने दिल्ली, कोलकाता, मुंबई इंडियन्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -