घरक्रीडाआशिया चषकासाठी आयपीएल स्पर्धेचे सामने कमी होणार नाहीत!

आशिया चषकासाठी आयपीएल स्पर्धेचे सामने कमी होणार नाहीत!

Subscribe

यंदा आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत होऊ शकेल अशी चर्चा आहे. परंतु, ही गोष्ट जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयला फारशी आवडलेली नाही. मागील आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषदेची (एसीसी) बैठक पार पडली, पण यात आशिया चषकाबाबत निर्णय होऊ शकला नाही. मात्र, पाकिस्तान आणि श्रीलंका आशिया चषकाच्या यजमानपदाची आदलाबदल करु शकेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदाची स्पर्धा श्रीलंकेत होऊ शकेल. परंतु, बीसीसीआयने याला विरोध दर्शवला असून यंदाच्या स्पर्धेबाबत अजून कोणताही निर्णय न झाल्याचे स्पष्ट केले आहे.

एसीसीच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती बीसीसीआयला मिळालेली आहे. बीसीसीआय पुन्हा-पुन्हा याबाबतचे स्पष्टीकरण देणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच यंदा आशिया चषक स्पर्धा व्हावी यासाठी आयपीएलचे सामने कमी केले जाणार नाहीत असे परिस्थितीची माहिती असणार्‍यांना वाटते. आशिया चषकासाठी आयपीएलचे सामने कमी होणार नाहीत. जे लोक असा विचार करत आहेत, त्यांना भारत आणि बीसीसीआयची चिंता नाही.

- Advertisement -

मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही प्रसारकांचे (ब्रॉडकास्टर) नुकसान झाले होते. आता तर आपण आशिया चषकाबाबत बोलत आहोत. आयपीएलची गोष्टच वेगळी आहे. हे आकडे कोणाला कळत नाहीत? आयपीएल स्पर्धा होणे भारतीय क्रिकेटच्या हिताचे आहे. तुम्ही भारताच्या हिताला महत्त्व देणार की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हिताला?, असे काहींचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -