घरक्रीडा२३ वर्षाच्या इशान किशानची उत्कृष्ट कामगिरी, आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये घेतली ६८ व्या...

२३ वर्षाच्या इशान किशानची उत्कृष्ट कामगिरी, आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये घेतली ६८ व्या स्थानावर झेप

Subscribe

भारताचा सलामीवीर इशान किशनने (Ishan Kishan) आपल्या फलंदाजीतून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत भारताचा सलामीवीर इशान किशनने फलंदाजांच्या यादीत ६८ स्थानावर झेप घेतली आहे. आता तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनीही चांगली कामगिरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरू असलेल्या टी-२० मालिकेत किशनने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये १६४ धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो टी-२० मध्ये फलंदाजांच्या यादीत पहिल्या १० मध्ये प्रवेश करू शकला. टॉप १० मध्ये असणारा इशान किशन हा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल १४व्या स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा १६ व्या आणि श्रेयस अय्यर १७ व्या स्थानावर पोहोचले असून ते दोघेही एक-एक स्थानांनी घसरले आहेत. तसेच विराट कोहली दोन स्थानांवरून घसरून २१व्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

कसोटी क्रमवारीत रोहित आणि कोहली अनुक्रमे सातव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत, तर इंग्लंडच्या जो रूटने न्यूझीलंडविरुद्ध चालू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत सलग दुसरे शतक झळकावून अव्वल स्थान पटकावले आहे.

- Advertisement -

नॉटिंगघम कसोटीच्या पहिल्या डावात १७६ धावा करणाऱ्या रुटच्या ८९७ धावा आहेत. रूटचा देशबांधव जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनाही फायदा झाला आहे. बेअरस्टोने ९२ चेंडूत १३६ धावांच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या दिवशी पाच विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या शानदार खेळीमुळे बेअरस्टो १३ स्थानांवरून ३९व्या स्थानावर पोहोचला आहे, तर स्टोक्स २७ वरून २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. आव्हानांचा पाठलाग करताना त्याने ७५ धावांची नाबाद खेळी केली आहे.


हेही वाचा : ‘या’ रुग्णालयाच्या मदतीसाठी भारतीय संघ इंग्लंडसोबत खेळणार विशेष सामना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -