घरदेश-विदेशदेशातील सर्व राजभवनांना उद्या घेराव घालणार, काँग्रेस नेते आक्रमक

देशातील सर्व राजभवनांना उद्या घेराव घालणार, काँग्रेस नेते आक्रमक

Subscribe

नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी कुटुंबियांना ईडीची नोटीस आली असून केंद्रीय तपास यंत्रणेकडून सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. या दडपशाहीविरोधात उद्या देशातील सर्व राजभवनांचा घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. (Congress leader aggressive, All Raj Bhavan in the country will be besieged tomorrow)

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून गुंडगिरी केली जात आहे. हे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. त्याचा हिशोब द्यावा लागेल. आम्ही एफआयआर नोंदवण्याची मागणी करत आहोत. त्याचबरोबर शिस्तभंगाचीही चौकशी सुरू करावी. काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, उद्या देशातील सर्व राजभवनांचा घेराव करून परवा जिल्हास्तरावर जोरदार निदर्शने होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

- Advertisement -


रणदीप सुरजेवाला यांना ट्विट करूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते ट्विटमध्ये म्हणाले की, दहशत आणि अत्याचारा हा नंगा नाच संपूर्ण देश पाहत आहे. मोदीजी, अमित शाह आणि दिल्ली पोलीस, सर्वकाही लक्षात ठेवलं जाईल. मुख्यमंत्री, खासदार, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते आणि महिलांवर अत्याचार केल्यानंतर आता देशातील प्रमुख विरोधी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केला गेला, असंही ते म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -