घरक्रीडाजयेश तांडेल, हर्षालीला जेतेपद

जयेश तांडेल, हर्षालीला जेतेपद

Subscribe

वल्लभदास डागरा इंडियन सोसायटीच्या विद्यमाने आयोजित प्रथम डॉ. ए.वि.मेहता स्मरणार्थ विशेष मुलांसाठीच्या कॅरम स्पर्धेतील २२ वर्षांवरील मुले एकेरी गटाचे जयेश तांडेलने (सवेरा स्पेशल स्कूल), तर मुली एकेरी गटाचे विमलने (एम. डी. सी. होम) जेतेपद पटकावले. २२ वर्षांवरील मुले एकेरीच्या अंतिम सामन्यात जयेशने पुनर्वसु स्पेशल स्कूलच्या अभिमन्यू देसाईचा २५-३, २५-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

२२ वर्षांवरील मुलींच्या अंतिम सामन्यात विमलने ज्योती शर्मावर २५-६, २५-५ अशी मात केली. विजेत्यांना पदक, प्रशस्तीपत्र आणि स्ट्रायकर देऊन गौरवण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून अमोल शिंदे आणि तांत्रिक संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम यांनी काम केले.

- Advertisement -

गट विजेते –
मुले एकेरी : जयेश तांडेल (२२ वर्षांवरील) महेश (१६ ते २१ वर्ष), गणेश वर्मा (१२ ते १५ वर्ष), हमजा शेख (८ ते ११ वर्ष)
मुली एकेरी : विमल (२२ वर्षांवरील), हर्षाली (१६ ते २१ वर्ष), दिव्या वाडकर (१२ ते १५ वर्ष), गुलबशन शेख (८ ते ११ वर्ष)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -