घरक्रीडाऑनलाईन रम्मीचे प्रोमोशन केल्याने 'या' स्टार क्रिकेटपटूला केरळ हायकोर्टाची नोटीस 

ऑनलाईन रम्मीचे प्रोमोशन केल्याने ‘या’ स्टार क्रिकेटपटूला केरळ हायकोर्टाची नोटीस 

Subscribe

तमन्ना भाटिया आणि अजू वर्गीस यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

ऑनलाईन गेम्सची सध्या चलती आहे. विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोक आता ऑनलाईन गेमिंगकडे वळले आहेत. त्यामुळे भारताचे अनेक नामांकित खेळाडू, अभिनेते या अ‍ॅप्सचे प्रोमोशन करताना दिसतात. मात्र, याच गोष्टीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अडचणीत सापडला आहे. ऑनलाईन रम्मी गेमिंग पोर्टलचे प्रमोशन केल्यामुळे कोहलीला केरळ उच्च न्यायालयाने नोटिस पाठवली आहे. कोहलीप्रमाणेच अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कोहली, तमन्ना आणि अजू यांसारख्या लोकप्रिय व्यक्तींनी अशा अ‍ॅप्सचे प्रमोशन केल्याने युवकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे या याचिकेमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

ऑनलाईन रम्मीची लोकप्रियता वाढली

पॉली वडक्कन याने केरळ उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ‘ऑनलाईन रम्मी गेम्सची लोकप्रियता आता खूप वाढली आहे. केरळमध्ये या गेम्सवर बंदी घालणे गरजेचे आहे. लोकप्रिय आणि नामांकित व्यक्तींनी या गेम्सचे प्रोमोशन केल्याने युवावर्ग या गेम्सकडे आकर्षित होतो,’ असे वडक्कनने त्याच्या याचिकेत म्हटले आहे.

युवकाने केली आत्महत्या

तसेच ऑनलाईन गेम्समधून पैसे गमावल्याने अनेकांनी आत्महत्याचा केल्याचा दावा याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात केला होता. काही आठवड्यांपूर्वी तिरुअनंतपुरम येथे विनीथ नामक २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली होती. त्याने ऑनलाईन गेम खेळताना साधारण २१ लाख रुपये गमावले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -