घरक्रीडाSL vs ENG लागोपाठ चार टेस्ट इनिंगमध्ये भोपळा नाही फुटला, युजर्सने केले...

SL vs ENG लागोपाठ चार टेस्ट इनिंगमध्ये भोपळा नाही फुटला, युजर्सने केले ट्रोल

Subscribe

श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत एक नवा विक्रम श्रीलंकन खेळाडूच्या नावावर झालेला आहे. मॅचच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकेचा डाव अवघ्या ४६.१ ओव्हरमध्ये १३५ धावांवर आटोपला. पण या सामन्यात एका खेळाडून आपल्या नावावर एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी सामन्यामध्ये लागोपाठ चौथा इनिंगमध्ये खेळताना भोपळा न फोडू शकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावे झाला आहे. आजच्या दिवसातही हा खेळाडू दोन चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झाला. दुर्दैवाने आजच्या सामन्यात हा खेळाडू एकही धाव न करता आऊट झाला. लागोपाठ चार इनिंगमध्ये शून्यावरच बाद झाल्याने सोशल मिडियावर या खेळाडूच्या नावे अतिशय मजेदार मेम्स तयार झाले आहेत.

- Advertisement -

श्रीलंकन गोलंदाजाने केलेल्या या नव्या विक्रमामुळे एका युजरने ऑडी या आलीशान कारचा लोगो त्याच्या फोटोखाली शेअर केला आहे. श्रीलंकन गोलंदाज कुशल मेंडीसने लागोपाठ चार सामन्यात केलेल्या शून्य धावांसाठी हा ऑडीचा लोगा वापरला आहे. आजच्या सामन्यातही कुशल मेंडीस हा शून्यावर आऊट झाला. लागोपाठ चवथ्यांदा शून्यावर बाद झाल्याने मेंडीस हा ट्रोलिंग करणाऱ्यांचे लक्ष ठरला आहे. आजच्या सामन्यातही मेंडीस हा स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर जॉस बटरला कॅच देऊन बसला. आजच्या सामन्यात सर्वाधिक रन करणाऱ्या कॅप्टन दिनेश चंडीमलने २८ योगदान दिले. त्याशिवाय एंजलो मॅथ्यूजने २७ धावा, दसुन शनाकाने २३ धावा, कुशल परेरा २० धावा केल्या. इंग्लंडकडून डॉम बेसने पाच विकेट्स घेतल्या. तर ब्रॉडने तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडने आज दिवसअखेर दोन विकेट्स गमावून १२७ धावा केल्या आहेत. त्यामध्ये कॅप्टन जो रूट ६६ तर जॉनी ब्रेस्ट्रोने ४७ धावा करून नाबाद आहेत. इंग्लंडकडून जॅक क्रॉले ९ धावांवर तर डॉमनिक सिबले ४ धावा करून बाद झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -