घरक्रीडाखडूच्या तुकड्यावर फिफा वर्ल्डकप

खडूच्या तुकड्यावर फिफा वर्ल्डकप

Subscribe

चंदिगडमधील बलराज सिंग यांनी चक्क खडूच्या एका तुकड्यापासून फिफाचा विश्वचषक तयार केला आहे. व्यवसायाने शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असणारे बलराज सिंग आपल्या लघु शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत

फिफा २०१८चा विश्वचषक रशियात सुरू आहे. नेहमीप्रमाणेच फिफाचे फिव्हर संपूर्ण जगावर चढलेले दिसून येत आहे. यात भारतही मागे नाही. फूटबॉलवर वर्ल्डकपवर आपले प्रेम दाखवण्यासाठी लोक विविध क्लुप्त्या लढवत आहेत. चंदिगडमधील बलराज सिंग यांनी चक्क खडूच्या एका तुकड्यापासून फिफाचा विश्वचषक तयार केला आहे. व्यवसायाने शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असणारे बलराज सिंग आपल्या लघु शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. आपले फुटबॉलवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी बलराज यांनी हे लघुशिल्प तयार केले आहे.

ही ट्रॉफी तयार करण्यासाठी अवघे ३ तास लागले. यावेळी त्यांनी सांगितले की, “मला माझी कौशल्य आणि फुटबॉलवरील प्रेम यांना एकत्र करून काहीतरी नवीन तयार करायचे होते, मी फुटबॉलचा एक प्रचंड चाहता आहे आणि त्यासाठीच मी हे लघुशिल्प तयार केले आहे.”

- Advertisement -
balraj fifa
फोटो सौजन्य- ANI

मेस्सीचा जबरा फॅन

पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपले अर्जेंटीना देशावरील प्रेम दर्शविण्यासाठी थेट सर्व घरच अर्जेंटीनाच्या झेंड्याच्या रंगात रंगविले आहे. तो अर्जेंटिनियन स्ट्रायकर लिओनल मेस्सीचा कट्टर फॅन आहे. त्याने यातून आपले मेस्सी आणि अर्जेंटीनावरील प्रेम दाखवले आहे.

lionel_messi_argentina
लिओनल मेस्सी

फिफाचा विश्वचषक रशियात दिमाखात सुरू

फुटबॉल खेळाची मानाची स्पर्धा मानली जाणारी फिफा विश्वचषक स्पर्धा रशियात सुरू आहे. फुटबॉलचा २१ वा विश्वचषक आहे. १५ जून ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ३२ देश सहभागी झाले आहेत. पहिल्याच वेळेस रशियात विश्वचषक होत असून जगभरातील फुटबॉलप्रेमी रशियात आपआपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले आहेत.

FIFA-World-Cup-2018
फुटबॉल विश्वचषक २०१८
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -