घरक्रीडामार्शचे ५ बळी; इंग्लंड २९४

मार्शचे ५ बळी; इंग्लंड २९४

Subscribe

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने पुनरागमनात घेतलेल्या ५ विकेट्समुळे अ‍ॅशेस मालिकेच्या पाचव्या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २९४ धावांमध्ये संपुष्टात आला. यावर्षी आपला पहिला कसोटी सामना खेळणार्‍या मार्शने ४६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. याचे उत्तर देताना दुसर्‍या दिवशी चहापानाला ऑस्ट्रेलियाची ४ बाद १४७ अशी धावसंख्या होती. त्यांचे सलामीवीर डेविड वॉर्नर (५) आणि मार्कस हॅरिस (३) यांना जोफ्रा आर्चरने झटपट माघारी पाठवले. यानंतर मार्नस लबुसचेन्ग आणि स्टिव्ह स्मिथ यांनी तिसर्‍या विकेसाठी ६९ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मात्र, आर्चरनेच लबुसचेन्गला ४८ धावांवर बाद केले. मॅथ्यू वेडला केवळ १९ धावा करता आल्या. स्मिथने एक बाजू लावून धरत ९१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानाला स्मिथ ५९ आणि मार्श १२ धावांवर नाबाद होता. ऑस्ट्रेलियाची ४ बाद १४७ अशी धावसंख्या होती.

त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव २९४ धावांवर आटोपला. त्यांच्याकडून जॉस बटलर (७०) आणि कर्णधार जो रूट (५७) या दोघांनाच अर्धशतक करता आले. त्यांच्या चार फलंदाजांनी २० धावांचा टप्पा पार केला, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – [दुसर्‍या दिवशी चहापानापर्यंत]
इंग्लंड : पहिला डाव – सर्वबाद २९४ (बटलर ७०, रूट ५७; मार्श ५/४६) वि. ऑस्ट्रेलिया : पहिला डाव – ४ बाद १४७ (स्मिथ नाबाद ५९, लबुसचेन्ग ४८; आर्चर ३/३०).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -