घरक्रीडाअव्वल स्थानासाठी नदाल- फेडररमध्ये टक्कर

अव्वल स्थानासाठी नदाल- फेडररमध्ये टक्कर

Subscribe

स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने काही दिवसापूर्वी झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत विजेपदावर आपले नाव कोरले होते. या विजयामुळे त्याचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम आहे. सध्या जगात त्याच्या स्थानाला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररच केवळ टक्कर देवू शकतो.
नदाल याने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचे आव्हान सरळ तीन सेट्समध्ये नमवले आणि अकराव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेतेपदावर मोहोर नोंदवली होती. त्याने ही लढत ६-४,६-३, ६-२ अशी जिंकली. सामन्यात थिमला एकही सेट जिंकता आला नाही.
नदालने यापूर्वीही २००५ ते २००८, २०१० ते २०१४ विजेतेपद मिळवले होते. हे त्याचे अकरावे विजेतेपद आहे. तसेच, नदालचा हा कारकिर्दीतील सतरावा ग्रँड स्लॅम विजय आहे. त्याने अमेरिकन स्पर्धेत तीन वेळा, विम्बल्डनमध्ये दोन वेळा तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेत एकदा जेतेपद पटकावले आहे.

rafel nadal
राफेल नदाल

मात्र, त्याच्या अव्वल स्थानाला फेडररकडून धक्कालागण्याची शक्यता आहे. फेडरर हा दीर्घ विश्रांतीनंतर स्टुगार्ट ओपन या स्पर्धेतून पुनरागमन करत आहे. फेडरर काही काळ आपल्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे त्याला आपल्या खेळावर लक्ष देता आले नाही. ज्याचा परिणाम त्याच्या जागतिक क्रमवारीतील स्थानावर झाला. त्यामुळे या स्पर्धेत जर फेडरर तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला, नदालला आपले अव्वल स्थान गमवावू लागू शकत. फेडरर तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला तर, जागतिक क्रमवारीतील त्याचे गुण वाढतील आणि त्यामुळे नदालच्या स्थानाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -
rogger fedrer
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील ‘फेदल’ वर्ल्डफेमस

फेडरर आणि नदाल हे दोघेही टेनिस खेळातील दिग्गज. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील चुरशिला ‘फेदल’ असे म्हटले जाते. नदाल आपल्या क्ले कोर्टवरील तर फेडरर आपल्या ग्रास कोर्टवरील खेळासाठी फेमस आहेत. प्रतिस्पर्धी, म्हणून ३८ वेळा ते खेळले असून सध्या ते जागतिक क्रमवारीत शीर्षस्थानी आहेत. ज्यात नदाल पहिल्या तर फेडरर दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. मात्र दोघातील खेळातील चुरस नेहमीच वाढत असलेली दिसून येते.

nadal vs fedrer
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -