घरक्रीडाकसोटीतील स्थानासाठी रोहीतची ‘कसोटी’

कसोटीतील स्थानासाठी रोहीतची ‘कसोटी’

Subscribe

भारतीय संघाचा तडाखेबाज फलदांज रोहीत शर्माला आयपीएलचे २०१८ चे वर्षे काही चांगले गेले नाही. पण आता त्याने एका मुलाखातीत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. “कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी ६ वर्षे वाट पाहायला लागली. २०१० च्या कसोटी संघात निवड झाली होती, दुखापतीमुळे ती संधी गमवावी लागली. त्याचे आज दु:ख होत आहे”, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली आहे. तसेच ज्येष्ठ खेळाडूंचा त्याच्या कसोटी कारकिर्दीवर काय परिणाम झाला? याबद्दलही रोहितने मन मोकळे केले आहे.

ज्येष्ठांमुळे कसोटीला उशीर

रोहितने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रोहित म्हणाला की, “मला २०१० साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी होती. दुखापत झाल्यामुळे मला ती संधी गमवावी लागली. त्यानंतर मात्र मला थेट २०१६ साली संधी मिळाली. सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि गांगुली यांसारखे खेळाडू संघात होते. त्यामुळे माझ्यासारख्या नवोदित खेळाडूला कसोटी खेळण्यासाठी ६ वर्षाचा काळ लागला.”

- Advertisement -

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मी २० व्या वर्षी पदार्पण केले. कसोटीतील पहिला सामना मी वयाच्या २६व्या वर्षी खेळलो. त्यावेळी मला समजून चुकले की एखादी संधी गेली तर काय होते? संधी गेल्यानंतर मला हे देखील कळून चुकले की एखाद्या गोष्टीची वेळ यावी लागते. त्यामुळे आता मी संघात स्थान मिळेल की नाही, याचा विचारही करत नसल्याचे रोहितने सांगितले.

संघातील स्थानाचा आता विचार करत नाही

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी रोहितला संघातून वगळण्यात आले आहे. त्याबाबत तो म्हणाला की, मी जेव्हा अगदी नवखा होतो, तेव्हा संघ जाहीर होण्याच्यावेळी मी संघात असेन का? याचा मी सतत विचार करत होतो. पण आता मी संघातील स्थानाचा विचार करत नाही. मला संघात स्थान मिळाले, तर मी खेळतो आणि क्रिकेटचा आनंद घेतो. पण विचार करत नाही, कारण त्यामुळे केवळ दडपण येते, असेही तो म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -