Novak Djokovic Out Of Australian Open: नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन मुकणार, ३ वर्षांची बंदी कायम

novak djokovic
नोवाक जोकोविच

टेनिसपटू नोवाक जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ खेळण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. ऑस्ट्रेलियन कोर्टात नोवाक जोकोविचने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. जनहिताच्या निर्णयाच्या आधारावर जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा याआधीचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे जोकोविचला मायदेशी परतावे लागणार आहे. जोकोविचने ऑस्ट्रेलियन कोर्टाच्या निर्वासनाविरोधात अपिल केली होती. पण ही अपिल न्यायालयाने फेटाळून लावली. जोकोविचची तीन वर्षांची ऑस्ट्रेलिया प्रवेशाची बंदीही या आदेशान्वये कायम राहणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ या स्पर्धेपासून जोकोविचला मुकावे लागणार आहे.

जोकोविचचने covid-19 विरोधात लसीकरण पूर्ण केलेले नाही. व्यापक जनहिताच्या मुद्द्यावर व्हिसा रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारकडून घेण्यात आला होता. त्यामुळेच आता जोवर जोकोविचला निर्वासित केले जाणार नाही, तोवर मेलबर्नमध्ये त्याला नजरकैदेत ठेवण्यात येईल. निर्वासन आदेशामुळे जोकोविचला आगामी तीन वर्षे ऑस्ट्रेलियात परतता येणार नाही. या निर्णयामुळे पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ स्पर्धेतूनही जोकोविच बाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारकडून न्यायालयात याआधी देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार लसीकरण पूर्ण न करण्याचा निर्णय म्हणजे ऑस्ट्रेलियात लसीकरणाच्या मोहिमेवर प्रभाव करणार असू शकतो असा युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच सार्वजनिक आरोग्य आणि हिताच्या दृष्टीनेही ही गोष्ट धोकादायक असू शकते, असा युक्तीवाद करण्यात व्हिसा रद्द करण्याच्या मागणीच्या वेळी करण्यात आला.

याआधी जोकोविचचा ६ जानेवारीला मेलबर्नला पोहचल्यावर रद्द करण्यात आला होता. लसीकरण पूर्ण न झालेल्या व्यक्तींना ऑस्ट्रेलियात नियमांनुसार कोणतीही सूट देण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण ऑस्ट्रेलियन सरकारकडून देण्यात आले होते. वीज रद्द झाल्याने जोकोविचला ताब्यात घेण्यात आले होते. व्हिसा रद्द झाल्यामुळे जोकोविचने वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणातील सुनावणी आज रविवारी पार पडली. पण या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळेच या प्रकरणात जोकोविचला कोणताही दिलासा मिळाला नाही. येत्या सोमवारपासून वर्षातील पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनला सुरूवात होत आहे.

याआधी जोकोविचने आपल्याला कोरोनाची लागण झाली असून अॅण्टीबॉडिज घेतल्याचा युक्तीवाद केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारच्या कोरोना विरोधी दोन लसीच्या नियमांना त्याने आव्हान दिले होते. पण सार्वजनिक हित लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला.