घरक्रीडाEng vs Pak : हाफिजची झंझावाती खेळी; तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान विजयी  

Eng vs Pak : हाफिजची झंझावाती खेळी; तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान विजयी  

Subscribe

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.  

मोहम्मद हाफिजच्या झंझावाती अर्धशतकामुळे पाकिस्तानने तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ५ धावांनी मात केली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. पाकिस्तानने तिसरा सामना जिंकल्याने तीन सामन्यांची ही १-१ अशी बरोबरीत संपली. पाकिस्तानकडून हाफिजने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ धावांची खेळी केली.

हैदरची दमदार खेळी

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाकिस्तानचे सलामीवीर फखर झमान (१) आणि कर्णधार बाबर आझम (२१) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. यानंतर मात्र हाफिज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हैदर अलीने पाकिस्तानचा डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. १९ वर्षीय हैदरने ३३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणात अर्धशतक करणारा हैदर हा पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला. तो बाद झाल्यावरही हाफिजने आक्रमक फलंदाजी केल्याने पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १९० अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

वहाब रियाझच्या २ विकेट

१९१ धावांचा पाठलाग करताना टॉम बँटन (४६) वगळता इंग्लंडचे आघाडीच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. इंग्लंडची ४ बाद ६९ अशी अवस्था झाली होती. मोईन अलीने ३३ चेंडूत ६१ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यामुळे इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८५ धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून अनुभवी वहाब रियाझने अवघ्या २६ धावांत २ गडी बाद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -