घरक्रीडा१३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

१३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Subscribe

आयपीएलचा हंगाम सध्या भारतात जोर धरत आहे. देशी विदेशी खेळाडूंची चमकदार कामगिरी आयपीएलच्या निमित्ताने अपेक्षित आहे. अशातच एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निवृत्तीचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आयपीएल फॅन्सना हा एक मोठा झटका मानला जात आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियन विकेटकीपरने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा झटका बसला आहे.

ऑस्ट्रेलियन विकेटकीपर पीटर नेविलने शुक्रवारी १३ वर्षांच्या क्रिकेट करिअरनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय नेविलने घेतला आहे. एकुण १३ वर्षांच्या कारकिर्दीत पीटर नेविलने १७ कसोटी सामने तर टी २० चे एकुण २० सामने खेळले आहेत. पीटर नेविलने वयाची ३६ वर्षे पूर्ण केली आहेत. त्याने आपला शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामना हा २०१६ मध्ये खेळला होता. न्यू साऊथ वेल्ससोबत त्यांनी एक उत्तम करिअर केले होते.

- Advertisement -

शील्ड मॅचमध्ये पीटर नेविलने कर्णधारपद भूषावले होते. एकुण ४३ शील्ड मॅचेसमध्ये कर्णधारपद भूषावल्यानंतर नेविलने अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला. इतिहासात कोणत्याही इतर खेळाडूपेक्षा सर्वाधिक एमएसडब्ल्यू साटी १०० हून अधिक शील्ड मॅच खेळणारे चौथे खेळाडू ठरले. यंदा दुखापतीमुळे नेविलचा सीझन यंदा वेळेपेक्षा आधीच संपुष्टात आला. पीटर नेविलने ३१० हून अधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड केला आहे.

 

- Advertisement -

नेविलचे स्पष्टीकरण

पीटर नेविलने स्पष्ट केले की, मला माहित होते की, माझे करिअर आता संपुष्टात आले आहे. मला दुखापतीमुळे करियरचे अधिक सामने गमवावे लागले आहेत. मला अतिशय गर्व आहे की, मला ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची संधी मिळाली. तसेच न्यू साऊथ वेल्ससोबत अधिक काळ खेळण्यासाठी आणि योगदान देता आले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

 

६ वर्षांपूर्वी खेळला शेवटचा सामना

पीटर नेविलने २०१५/१६ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी एकुण १७ सामने खेळले. नेविलने २०१५ मध्ये एशेज मालिकेत लॉर्ड्स टेस्टसाठी ब्रॅड हॅडिनची जागा घेतली होती. त्यानंतर नेविलने एकुण १७ लामने खेळले. पण फलंजादीमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यात नेविलला अपयश आले. नेविलने २२.२८ च्या सरासरीने धावा केल्या त्यामध्ये तीन अर्ध शतकांचा समावेश आहे. त्याशिवाय घरगुती सामन्यांमध्ये ३६.८१ च्या सरासरीने १० प्रथम श्रेणी सामन्यात ५९२७ धावा नेविल्सने केल्या. होबार्ट येथे दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात अतिशय वाईट पराभवानंतर निवड समितीने विकेटकीपर म्हणून मॅथ्यू वेडला संधी दिली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -