घरक्रीडाBWF World Tour Finals : पी.व्ही सिंधू आणि लक्ष्यचा उपांत्यफेरीत प्रवेश; चिराग-सात्विकच्या...

BWF World Tour Finals : पी.व्ही सिंधू आणि लक्ष्यचा उपांत्यफेरीत प्रवेश; चिराग-सात्विकच्या जोडीने घेतली माघार

Subscribe

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनने देखील बॅडमिंटन जागतिक महासंघ वर्ल्ड टूर फाइनल्सच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनने देखील बॅडमिंटन जागतिक महासंघ वर्ल्ड टूर फाइनल्सच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूने जर्मनीच्या युवोन लीचा सरळ सेटमध्ये पराभव करून ग्रुप स्टेजमध्ये सलग दुसरा विजय मिळवला सोबतच उपांत्यफेरीत देखील जागा मिळवली आहे. तर लक्ष्य सेनने पराभवानंतर देखील उपांत्यफेरीत स्थान मिळवले आहे. कारण जागतिक पातळीवर अव्वल स्थानावर असलेला खेळाडू आणि दोनवेळा विश्व चॅम्पियन केंटो मोमोटा आणि रासमुस गेमके यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

दरम्यान, दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यला डेनमार्कच्या विक्टरने २१-१४, २१-१५ अशा फरकाने पराभूत केले. ४६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात लक्ष्यने खूप संघर्ष केला. भारतीय खेळाडू सामन्यादरम्यान त्याची लय प्राप्त करू शकला नाही मात्र उपांत्यफेरीत त्याच्याकडे पुनरागमनाची संधी आहे.

- Advertisement -

सिंधूचे शानदार प्रदर्शन

जर्मन खेळाडूच्या विरोधात सिंधूने ३१ मिनिटांत विजय मिळवला. तिने युवोन लीचा २१-१०, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. यापूर्वी तिने डेन्मार्कच्या लिन क्रिस्टोफरसन २१-१४, २१-१६ अशा फरकाने पराभूत केले होते. तर चिराग आणि सात्विक या जोडीने या स्पर्धेतून आपली नावे मागे घेतली. या जोडीपूर्वी सायना नेहवालने देखील दुखापतीमुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. १२ ते १९ डिसेंबर दरम्यान स्पेनमधील हुएल्व्हा येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा खेळवली जाणार आहे.


हे ही वाचा: http://Pro Kabaddi League : बंगळुरूमध्ये २२ डिसेंबरपासून सुरू होणार आठवा हंगाम; प्रेक्षकांविना होणार सामने

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -