घरक्रीडाटोरंटो मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेत नदाल विजयी

टोरंटो मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेत नदाल विजयी

Subscribe

कॅनडात पार पडलेल्या टोरंटो मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेत पुरूष गटात राफेल नदालने तर महिला गटात सिमोना हॅलेपने विजेतेपद पटकावले आहे.

स्पेनच्या स्टार टेनिसपटू राफेल नदालने टोरंटो मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत विजेतेपद पटकावले असून ये त्याच्या कारकिर्दीतील ८० वे विजेतपद आहे. अंतिम सामन्यात नदालने ग्रीसच्या स्टीफानोस सितसिपासला नमवत सामना आपला नावे केला. तर दुसरीकडे महिला गटात सिमोना हॅलेपने युएसएच्या स्लोअन स्टीफन्सला मात दिली.

- Advertisement -

असे पार पडले अंतिम सामने

पुरूष गटात पार पडलेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या नदालने सुरूवातीपासूनच सामन्यात आपले वर्चस्व कायम राखले होते. नदालने सितसिपासला ६-२, ७-६(७-४) असे सरळ दोन सेट्समध्ये नमवत सामना आपल्या नावे केला. तर दुसरीकडे महिला गटात सिमोना हॅलेपने स्टीफन्सचा ७-६, ३-६, ६-४ अशा तिन सेट्समध्ये पराभव करत सामना आपल्या नावे केला.


यासोबतच पुरूष दुहेरी सामन्यात हेन्री कोन्टीनन आणि जॉन पीयर्स यांनी विजेतेपद पटकावले आहे. तर महिला दुहेरीत अॅशले बार्टी आणि डेमी स्कर्सने विजय मिळवला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -