घरक्रीडाकोरिया दौर्‍यासाठी राणी रामपाल कर्णधार

कोरिया दौर्‍यासाठी राणी रामपाल कर्णधार

Subscribe

कोरियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपालची पुन्हा एकदा भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. दुखापतीमुळे राणीला मलेशिया दौर्‍याला मुकावे लागले होते. मात्र, आता फिट झाल्याने तिचे संघात पुनरागमन झाले असून, गोलरक्षक सविताची उपकर्णधार म्हणून नेमणूक झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना २० मे रोजी होईल.

कोरियाविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघाला एफआयएच वूमन्स सिरीज फायनलआधी सरावाची चांगली संधी आहे. वूमन्स सिरीज फायनल ही स्पर्धा १५ ते २३ जून या कालावधीत हिरोशिमा येथे होणार आहे. यावर्षीच्या भारताने स्पेन आणि आयर्लंड यांचे दौरे केले आहेत. यामध्ये भारताला २ सामने जिंकण्यात यश आले होते, तर ३ सामने बरोबरीत राहिले होते आणि १ सामना भारताने गमावला होता. तसेच भारताने मलेशियाविरुद्धची मालिका ४-० अशी जिंकली होती. आता भारताला कोरियाविरुद्धच्या मालिकेत आपली चांगली कामगिरी सुरू ठेवण्याची संधी आहे.

- Advertisement -

हा संघ निवडल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन म्हणाले, राणी आणि गुरजीत कौर या अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्याचा मला आनंद आहे. हा दौरा म्हणजे आमच्यासाठी हिरोशिमा येथे होणार्‍या एफआयएच वूमन्स सिरीज फायनलआधी सरावाची चांगली संधी आहे. आम्ही मागील दोन दौर्‍यांत ज्या चुका केल्या, त्या सुधारण्यावर भर देत आमच्या खेळात सुधारणा केली आहे. कोरियाविरुद्ध खेळणे आवाहनात्मक असणार आहे, पण आमचा संघ यासाठी तयार आहे.

भारतीय संघ
गोलरक्षक – सविता, रजनी इतिमारपू
बचावफळी – सलीमा टेटे, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस एक्का, करिश्मा यादव, गुरुजीत कौर, सुशीला चानू पख्रमबॅम
मधली फळी – मोनिका, नवजोत कौर, निकी प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिन्झ
आघाडीची फळी – राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेमसियामी, ज्योती, नवनीत कौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -