घरक्रीडाRCB vs MI : पहिल्या सामन्यातील पराभव पचवू शकला नाही रोहित शर्मा,...

RCB vs MI : पहिल्या सामन्यातील पराभव पचवू शकला नाही रोहित शर्मा, फलंदाजांसोबत गोलंदाजावर राग अनावर

Subscribe

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा निराशाजनक झाली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभव होण्याचा 10 वर्षे जुना इतिहास मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा बदलू शकली नाही. बंगळुरूच्या सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फॅफ डुप्लेसी समोर मुंबईची गोलंदाजी सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे आरसीबीने 8 विकेट्स राखून 172 धावांचे आव्हान अगदी सहज पूर्ण केले.

पराभवानंतर रोहितचा राग अनावर
पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर कमालीचा नाराज दिसला. त्याने फलंदाजांबरोबर गोलंदाजांवर आपला राग व्यक्त केला. त्याने म्हटले की, “फलंदाजीसाठी ही खेळपट्टी चांगली होती, पण आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये फलंदाजी करताना चांगली सुरुवात करू शकलो नाही. टिळक वर्मा आणि इतर काही फलंदाजांनी शानदार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले, मात्र आमचे गोलंदाज त्या धावांचा बचाव करू शकले नाहीत.”
“आम्हची सुरुवात खराब झाल्यामुळे आम्ही कोणतेही लक्ष्य निश्चित केले नाही, कारण आमची कामगिरी आमच्या क्षमतेच्या निम्मीही नव्हती आणि तरीही आम्ही 170 धावा करण्यात यशस्वी झालो. कदाचित आणखी 30 ते 40 धावा झाल्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करवा लागला.”

- Advertisement -

टिळक वर्माचे केले कौतुक
युवा फलंदाज टिळक वर्माने खेळलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीचे रोहित शर्माने कौतुक केले आहे. तो म्हणाला की, “टिळक वर्मा एक सकारात्मक आणि सक्षम व्यक्ती असून त्यांने त्यांच्या खेळीदरम्यान काही चांगले शॉट्स खेळले आणि आम्हाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यासाठी टिळक वर्माला सलाम.” टिळक वर्माने वेगवान फलंदाजी करताना 46 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 84 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्यामुळे मुंबई संघ निर्धारीत 20 षटकात 171 धावांपर्यंत मजल मारू शकला.

कोहली-डुप्लेसीची धमाकेदार खेळी
मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या 172 धावांचे आव्हान बेंगळुरू संघाने अवघ्या 16.2 षटकांत केवळ 2 विकेट गमावून पूर्ण केले. बेंगळुरू संघाने आयपीएल 2023 ला धमाकेदार सुरुवात केली. कोहली आणि डुप्लेसी यांनी पहिल्या विकेटसाठी 14.5 षटकांत 148 धावांची भागीदारी केली. डुप्लेसिसने 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या, तर कोहली 49 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 82 धावा करून नाबाद राहिला. त्याने षटकार मारून आरसीबीला मोसमातील पहिला विजय मिळवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -