घरक्रीडारिषभ पंत यशस्वी होण्यासाठी त्याचा फलंदाजीचा क्रम निश्चित करा - कैफ

रिषभ पंत यशस्वी होण्यासाठी त्याचा फलंदाजीचा क्रम निश्चित करा – कैफ

Subscribe

पंतच्या फलंदाजीचा क्रम जोपर्यंत निश्चित केला जात नाही, तोपर्यंत तो यशस्वी होणार नाही, असे कैफला वाटते.  

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी एका वर्षाहून जास्त काळ क्रिकेट खेळलेला नाही. भारतीय संघ त्याला वगळून युवा रिषभ पंतला संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, पंतला या संधीचा उपयोग करता आलेला नाही. फलंदाजीत तो वारंवार खराब फटके मारून बाद झाला आहे, तर यष्टींमागेही काही चुका केल्या आहेत. त्यामुळे त्याने एकदिवसीय आणि टी-२० संघातील स्थान गमावले आहे. मात्र, पंत प्रतिभावान खेळाडू असल्याने तो कामगिरीत सुधारणा करेल अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे. परंतु, पंतच्या फलंदाजीचा क्रम जोपर्यंत निश्चित केला जात नाही, तोपर्यंत तो यशस्वी होणार नाही, असे भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला वाटते.

मोठे फटके मारण्याची मोकळीक द्या 

पंत आक्रमक शैलीत फलंदाजी करतो. त्याला अगदी पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारण्याची मोकळीक दिली पाहिजे. त्याचा फलंदाजीचा क्रम निश्चित करणे गरजेचे आहे, जेणेकरून किती षटके खेळायला मिळणार याबाबत त्याच्या डोक्यात गोंधळ होणार नाही, असे कैफ म्हणाला. कैफ आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक असून पंतही याच संघातून खेळतो. पंतने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला फारसे यश मिळालेले नाही.

- Advertisement -

कोणत्या क्रमांकावर पाठवायचे याबाबत चर्चा केली

रिकी पॉन्टिंग (दिल्लीचा प्रशिक्षक), सौरव गांगुली (दिल्लीचा माजी सल्लागार) आणि मी सुरुवातीला एकत्र बसून पंतला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले पाहिजे याबाबत चर्चा केली होती. २० षटकांपैकी किमान १० षटके त्याला फलंदाजीसाठी मिळायला हवीत असे आम्ही ठरवले. तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येतो याला महत्त्व नसून त्याला किमान ६० चेंडू खेळायला मिळाले पाहिजेत असे आम्हाला वाटले. मात्र, भारतीय संघाने अजून त्याची जागा निश्चित केलेली नाही, असे कैफने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -